कटलेट (भाजीशिवाय)

  • ५ मध्यम आकाराचे बटाटे
  • २ वाट्या जाड पोहे
  • अर्धी वाटी बेसन
  • ४-५ मिरच्या,ब्रेड क्रम १ वाटी
  • मीठ, गोडा मसाला,आलं-लसुण पेस्ट,खायचा सोडा (हवा असल्यास)
  • तळण्याकरता तेल
१५ मिनिटे
१८-२० कटलेट

बटाटे उकडवून व किसुन घ्यावेत घ्यावेत. त्यात पोहे भिजवुन घालावेत. त्यातच अर्धी वाटी बेसन,अर्धा चमचा गोडा मसाला, आलं-लसुण पेस्ट,चवीपुरते मीठ,( आवडत असल्यास खायचा सोडा चिमुटभर ), मिरच्यांचे तुकडे असं सगळं घालावे. वाटल्यास चिमुटभर लाल तिखट घालावे.

ब्रेड क्रम म्हणजे ब्रेड च्या टोस्टर मधुन ३ मिनिटांकरता ठेऊन काढुन चुरुन वरील मिश्रणात घालावे. हवे त्या आकाराचे कटलेट करुन घ्यावेत व  deep fry  करावेत.

आयत्यावेळी पाहुणे आल्यास चवदार चटपटीत अशी ही भाजी शिवायची ही कटलेट छान लागतात व भाज्यांची चिरा-चिरी नसल्याने अगदी लवकर होतात.

सायली जोशी