पुणे आणि खड्ड्यातलें पुणे

पुण्यातील अनेक लोकांना हे ठाऊक असेल की पुण्यातील रस्ते हे सध्या खड्डेविरहित झालेले आहेत. म्हणजे असे पुण्याच्या महापौर आणि नवा सकाळ [पत्रकारितेतर सकाळ] यांचे मत आहे.


माझ्यामते पुण्यातील खड्डे आहे तिथेच आहेत. ह्या साठी पहिल्यांदा खड्डा म्हणजे काय हे विषद केले पाहिजे. रस्ता जर समतल पातळीमधे नसेल तर खड्डा आहे असे समजावे. उदा. जुना खड्डा बुजवताना झालेला उंचवटा हा ह्या प्रकारात मोडतो.


सकाळने चालू केलेल्या मोहिमेची फलश्रृती काय?


१. सकाळला प्रसिद्धी मिळाली


२. महापौर आता गाडी वापरतात


३. खड्ड्यांचे रस्ते बनवणारे जे लोक आहेत त्यांना माफी.


आणि पुणेकरांना काय मिळाले,


१. ह्यावर्षी ही खड्डे


२. पुढल्या वर्षीही खड्डे........आणि फक्त खड्डे.


ह्यावर आपले मत