श्री गणेश वंदना
गजानना तुज वंदन करीतो
भरुनी अंजली सुमनांची
आशिर्वच दे अम्हा मोरया
चरणी पार्थना ही अमुची
लडिवाळ हे रुप गोजिरे
प्रसन्न भासे सदा साजिरे
माता अंबा दृष्ट काढिते
सदैव अपुल्या पुत्राची
आशिर्वच दे अम्हा मोरया
चरणी पार्थना ही अमुची
अपार लीला तुझ्या गणेशा
सवे रंगसी रिद्धि सिद्धिच्या
नाथ गणांचा तूच शोभतो
चिंता वाही जगताची
आशिर्वच दे अम्हा मोरया
चरणी पार्थना ही अमुची
वरदविनायक, करुणागारा
सारी विघ्ने नेसी विलया
सिंदूरवदना, मयूरेश्वरा
करीसी दैना दु:खाची
आशिर्वच दे अम्हा मोरया
चरणी पार्थना ही अमुची
पार्वतीनंदन, हे जगवंदन
तिन्ही लोकीचा त्राता भगवन
भवसागर हा तरण्या देवा
नाव हाक तू भक्तांची
आशिर्वच दे अम्हा मोरया
चरणी पार्थना ही अमुची
जयश्री
२८.८.२००६