सृष्टि निर्मात्या, सृष्टि पालका, सृष्टि संहारका
नमन माझे तुज हे गणनायका
अविनाशी आत्मस्वरुपा, सकलव्यापका
तुझे नाम ध्यानी मनी, माझ्या रक्षका
नेत्र पाहती रुप तुझे सदैव, आशापुरका
मुख गाइ गान तुझे नित्य विनायका
कृपा करी जगदराया तु आपुल्या उपासका
आनंदमय ब्रम्हमय तु भक्तांच्या पालका
ज्ञानमय विज्ञानमय वर दे पुजका
तुझ्यासारखा तुच , तु जगताच्या शुभका
अद्वैता, पंचमहाभुता माझ्या विघ्ननाशका
मनोरथ पूर्तीचा अशिर्वाद दे तु भाविंका
ब्रम्ह, विष्णू, रुद्र , इंद्र तुज ठायी शुभदायका
अग्नी, वायु, सूर्य, चंद्र तुच करुणाकारका
निरंतर तुझे स्मरण विश्वव्यापका
नमन माझे तुज हे गणनायका