मन उधान

मन उधान


पाहावी करून चोरी


सुखांची अन दुःखांची


झोपावे उघड्यावरती


छप्पर आकाशाचे डोईवरती


घ्यावी ऊब मातीची


किल बिल करती पाखरे


इवली इवलीशी


रमतात मने जेव्हा


त्या हिरव्या निसगा भोवती


वाहतो मग वारा घेवूनी


सोबत गारव्याची


पाहावी करून चोरी


सुखांची अन दुःखांची