पुन्हा

येइल का फ़िरुनी ती सांजवेळ पुन्हा


हृदयी ठसुन गेल्या हळव्या जिच्या खुणा त्या


हलकेच ते फ़िरावे जणु श्वास,मोरपिस


तु गीत त्या स्वरांचे गाशिल का पुन्हा रे......


मिटल्याच पापण्यांची तु आर्जवे करावी


ओठांवरी अबोली फ़ुलुनी भरास यावी


तु गंधिताच व्हावे हे मुक्त श्वास माझे


पुन्हा नव्या सुरांनी मी धुंद गीत गावे......


गाइल चांदणेही व्याकुळ तेच गाणे


वाहील अन समीर मोहुन तव दिशेने


भिजतिल चिंब गात्रे धारांत त्याच पुन्हा


घेवुन साक्षीला ये हलक्या जुन्या खुणा रे.....


शीला