थोरण केरळी भाजीचा एक प्रकार

  • कोबी/फरसबी/पालेभाजी यापेकी १ १/२ किलो
  • ओले खोबरे १/२ वाटी
  • मद्रास कांदे/कांदे १/२ वाटी
  • जीरे १ टी स्पुन
  • लसुण२/३ पाकळ्या,तेल, मीठ,कढीपत्ता, लाल मिर्ची१,मोहरि
  • हिरवी मिर्ची २/३ , चिमुट्भर हळद,तांदुळ १ टेबलस्पुन,
३० मिनिटे
५ जणांना पुरेशी भाजी

भाजी चिरून घ्या. नारळाचा चव,मद्रासकांदे,जिरे,लसूण,हिरवी मिरची एकत्र वाटून घ्या.कढईत तेल गरम करून त्यात मोहरी कढीपत्ता तांदूळ घाला, तडतडल्यावर त्यात भाजी घालून जरा परता. मीठ घाला. भाजीच मधोमध खळगा करून त्यात वाटण घाला,भाजीने वाटणं झाकून घ्या, कढईवर झाकण घालून दणदणीत वाफ आणा, शिजल्यावर हलक्या हाताने ढवळा

केरळी शाकाहारी पदार्थ .कच्ची पपई ,कोबी ऐवजी वापरली तरीही चालते. २००१ लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेले सर्वच लेख (खाद्य संस्र्कॄती)छान होते. काही पदार्थ करून बघितले/आवडले त्यांतील  'थोरण' हा एक प्रकार मनोगतच्या वाचकांसाठी.

'खाद्य संस्र्कॄती' मोहसिना मुकादम लोकसत्ता ०२/०६/२००१