कित्येक रात्री तळमळत काढल्यानंतर
काल उठलो तिरीमिरीने ...
अन शोधून काढली
अडगळीत पडलेली
ती लहानपणीची गोधडी...
धागे उसवले होते अन दिसत होते
सुरकुत्यांसारखे ...
आता काय हिचा उपयोग म्हणून
फेकून देणार इतक्यात जाणवलं
गोधडी थंडीने कुडकुडत होती ...
अन माजघरात कुणी स्त्री रडत होती...
आई असावी बहुधा !!!!