सुप्रिया सुळे यांची उमेदवारी.

राज्यसभे मध्ये सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी तर्फे उमेदवारी देण्यात आलेली असल्यामुळे महाराष्ट्रातर्फे अजून एका तरुण राजकारण्याची सक्रिय राजकारण करण्यामध्ये भर पडलेली आहे. शरद पवारासारख्या मातब्बर आणि जाणकार राजकारणाची वारसदार म्हणून सुप्रिया यांच्या कडे बघितले जाईल हे निश्चित.

सुप्रिया यांना भविष्यात यश मिळो ही शुभेच्छा.

जाता जाता एक प्रश्न मनात येतो की, राज्यसभेचा उद्देश्य हा समाजातील ज्ञानी, विचारवंत लोकांना राजकारणाच्या विरहित सक्रिय राजकारणात जाता यावे हा असताना अनेक राजकीय पक्ष आपल्या नेत्यांना या मार्गानेच का पाठवतात हेच समजत नाही. शरद पवार सारख्या जनमताचा आधार असलेल्या नेत्यानेही याबाबत वेगळा पायंडा राखला असता तर बरे झाले असते.

असो.

परत एकदा सुप्रिया यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.

द्वारकानाथ कलंत्री.
पुणे.