गोपाळकाला

  • ८ वाट्या धानाच्या व ८ वाट्या ज्वारीच्या लाह्या, २ वाट्या जाड पोहे,
  • प्रत्येकी २ मोठे चमचे आंब्याचे व लिंबाचे गोड लोणचे १ वाटी दूध,
  • १ वाटी दही , २ काकड्या बारीक चिरलेल्या, १ वाटी भिजवलेली हरभरा डाळ
  • डाळ १/२ वाटी भिजवलेले दाणे, १ वाटी डाळिंबाचे दाणे,बारीक चिरलेली
  • हिरवी मिरची, कोथिंबीर, किसलेल आलं आपल्या आवडीनुसार.
३० मिनिटे
१० जणांना

लाह्या, पोहे  चाळून, निवडून व पाण्यातून काढून  घेतल्या की वाळुची बारीक कचकच खातांना लागत नाही. एका मोठ्या पातेल्यात वरील सगळे जिन्नस एकत्र  व चांगले मिसळून घ्या.  अतिशय रुचकर व पौष्टीक गोपाळकाला  तयार झाला.

हा पदार्थ बिघडण्याची शक्यता नाही कारण आवडीनुसार प्रमाण बदलता येतं. इथे नागपुरला गणपती विसर्जनाला प्रसाद म्हणून आवर्जून करतात. जन्माष्टमी व अनंत चतुर्दशीला काल्याची चव काही न्यारीच लागते. डाएट फूड म्हणून मी न जेवता पोटभर कालाच खाते. प्रत्येक वेळी काला खाताना औरंगपुऱ्यातील एकनाथ मंदिरातल्या एकनाथ षष्ठीच्या काल्याची चव जिभेवर रेंगाळते.

स्वानुभव