हिरवाळी

बऱ्याच वर्षांपूर्वी ही कविता लिहिली होती. आता पूर्ण आठवत नाही. जेवढी आठवली तेवढी देत आहे. नव्याने शेवट लिहायचा प्रयत्न केला पण मलाच आवडला नाही.


धुंद ही हवा पावसाळी


देई सृष्टीस या नव्हाळी


जणू बालतारकांची


झुडुपांवरी दिवाळी




मृद्गंध धुंद करतो


आनंद मनामधी भरतो


स्वप्नील मम मना तो


जणू स्वप्नसृष्टीमधी नेतो


नगरीत त्या विहरते


वेडेच माझे मन ते


नकळे का जुमानी ना


विवेकाच्या लगामा ते




 सृष्टीचा हिरवा रंग


मन क्षणात होई दंग


कुठून ही हिरवाळी


मम मनी उतरली सांग


......अपूर्ण .....