ती मज कडे पहायचि नित्यनियमने
काय बरे ती सुचवायची मज अपूल्या नयनाने?
वेळ मज लागला समजण्या ते एशारे.....
अरे ते तर होते पहिल्या प्रेमाचे फवारे.....
प्रेम फूले मग मनी बहरलि...
परि लाट भावनेची श्बदात अडकली...
एके दिवशी एकान्त पाहुनी तीला गाठ्ले.
अन प्रिये म्हनूणी हळुच स्मबोधले.....
प्रिये, तूज वरती प्रेम माझे जड्ले...
अन उत्तर तूझ्या नयना नी कळविले....
पूढे बोलावे, तोच अवचित काही घड्ले...
गोरे हात तिचे माझ्या गालवर पड्ले..
क्षणात चित्र सारे पालटून गेले...
याहि वेळी, डोळ्यानिच तिच्या उत्तर दिले....
तिची नजर कुठे,अन इशारा और होता,
ज्यानी माझ्या प्रेमाचा गळा घोट्ला होता........
"जवाबदार कोण" हा प्रश्न अनुत्तरित आहे...
कारण तीच्या डोळ्यात मी अजूनही शोधतो आहे.........!!!