चेहर्यावर नाही उमटत वेदना, आभार!
बधीर आज सार्या संवेदना, आभार!
निवडणुकीपुर्वी दिली कीती आश्वासने,
जिंकल्यावर देण्या उरले केवळ, आभार!
प्रेम वाटण्या नाही समजलात लायक,
परी निवडलेत देण्यास वेदना, आभार!
दोन वेळा जेवण वगैरे सारं काही क्षुद्र, मान्य
शिक्षण द्यायची व्यवस्था केलीत, आभार!
नाही दिलात अपेक्षापुर्तीचा निर्मळ आनंद,
अपेक्षाभंग सहन करायला ताकद दिलीत, आभार!