आज पुन्हा कुणीतरी
लहानांसारखे रडे
काय हवे त्याला ते
नसे माझ्याकडे
जाऊदेत रडून रडून
निजेल मग शांत
आज ना उद्या त्यालाही
पडेल तुझी भ्रांत
आता नाही येणार मी
परत पुन्हा तुझ्याकडे
थोडासा स्वाभिमान
आहे अजुन माझ्याकडे
किती वेळा मीच यायचे
किती वेळा तेच गायचे
किती वेळा सुरांचे
लावण्य झिजवायचे
गती तुझ्या मतीची
मला मुळी नसावी
एकतर्फी प्रेमाची ती
एकतर्फी ठेवण असावी
मी मात्र लिहायचे
अन तु मात्र पुसायचे
का नाही कधीतरी
गिरवून तु पाहायचे
लिहून लिहून थकलोय मी
आता पुरता कोसळलोय मी
एकट्याचेच द्वंद्व हे
पुन: पुन: हरलोय मी
निष्फळ प्रेमापायी या
कितीक पडती वेढे
कुणासही ना सोडे
कितीक झाले वेडे
म्हणुन म्हणतो
तोडतो साकडे
प्रेमाच्या सरणावर
प्रेमाचीच लाकडे
एकदा का झाले
घावात दोन तुकडे
मग एकटे आयुष्य
नरकाहून फाकडे
कधीतरी येशील तु
कधीतरी बसशील तु
कधीतरी हसशील तु
पुन: पुन: स्मरशील तु
कधी कधी हसेन मी
कधी कधी रडेन मी
कधी कधी लिहीन मी
पुन: पुन: पुसेन मी
काळजी नकॊ करु
वाया नाही घालवणार
तु दिलेलं वेड हे
मी पुरवून पुरवून वापरणार
अन लुटुपुटीचे आयुष्य
मरुन मरुन जगणार
पण परत पुन्हा तुझ्याकडे
मुळीच नाही येणार !
लहानांसारखे रडे
काय हवे त्याला ते
नसे माझ्याकडे
जाऊदेत रडून रडून
निजेल मग शांत
आज ना उद्या त्यालाही
पडेल तुझी भ्रांत
आता नाही येणार मी
परत पुन्हा तुझ्याकडे
थोडासा स्वाभिमान
आहे अजुन माझ्याकडे
किती वेळा मीच यायचे
किती वेळा तेच गायचे
किती वेळा सुरांचे
लावण्य झिजवायचे
गती तुझ्या मतीची
मला मुळी नसावी
एकतर्फी प्रेमाची ती
एकतर्फी ठेवण असावी
मी मात्र लिहायचे
अन तु मात्र पुसायचे
का नाही कधीतरी
गिरवून तु पाहायचे
लिहून लिहून थकलोय मी
आता पुरता कोसळलोय मी
एकट्याचेच द्वंद्व हे
पुन: पुन: हरलोय मी
निष्फळ प्रेमापायी या
कितीक पडती वेढे
कुणासही ना सोडे
कितीक झाले वेडे
म्हणुन म्हणतो
तोडतो साकडे
प्रेमाच्या सरणावर
प्रेमाचीच लाकडे
एकदा का झाले
घावात दोन तुकडे
मग एकटे आयुष्य
नरकाहून फाकडे
कधीतरी येशील तु
कधीतरी बसशील तु
कधीतरी हसशील तु
पुन: पुन: स्मरशील तु
कधी कधी हसेन मी
कधी कधी रडेन मी
कधी कधी लिहीन मी
पुन: पुन: पुसेन मी
काळजी नकॊ करु
वाया नाही घालवणार
तु दिलेलं वेड हे
मी पुरवून पुरवून वापरणार
अन लुटुपुटीचे आयुष्य
मरुन मरुन जगणार
पण परत पुन्हा तुझ्याकडे
मुळीच नाही येणार !
-प्रशांत