पाच वर्षांनंतर

आज वर्ल्ड ट्रेड सेंटर व पेंटागॉनवरील हल्ल्यांना पाच वर्ष झाली. इथे अमेरिकेत तर सर्वत्र तोच विषय दिसतो - टीव्हीवर, किंवा वर्तमान पत्रातून. गंमत अशी आहे, की लोकं आपलं सगळं लक्ष इथे झालेल्या बदलांवर देताहेत - विधवा आणि विधुर, अग्निशामक दलातील लोकं, मुसलमान नागरिक, इत्यादी - पण ओसामा अजून का सापडला नाहीये ह्याबद्दल कोणी चकार शब्दही काढत नाहीये!