वियोग - दोन कणिका

तू आभाळाचे गीत कशाला गातो
अन मृगजळाचा मीत कशाला होतो
संपली कहाणी, उरले केवळ पाणी
ती भातुकली, तो राजा आणिक राणी !


-----------------------------------


त्या चुंबनातुनी चिंब चिंब होण्याची
तू पाझरता मी थेंब थेंब होण्याची
ती सरली घटिका, सरले सारे प्रहर
अन अता वेळ ही टिंब टिंब होण्याची !