"पुन्हा एकदा दगड व्हायचयं..."

माझं मन मला सांगतय...


राहून राहून हेच बजावतयं


पुन्हा एकदा दगड व्हायचयं


मला पुन्हा एकदा दगड व्हायचयं.....


सोडून गेलेल्या तुला,


ती पुन्हा कधितरी दिसेल,


भेटुन तुला ती जरुर हसेल


पण मनात मात्रं तिच्या कुणि औरच असेल....


मलाही नुसतच हसुन पुढे चालायचयं,


म्हणुनच सांगतोय मित्रा...


मला दगड व्हायचयं


पुन्हा एकदा दगड व्हायचयं....


दगडातून सुंदर शिल्प बनून


तिच्या आठवनींना साकारायचयं


त्यासाठी मला असंख्य,


वेदनांना तोंड द्यायचयं...


तिलाही तुझी कधितरी आठवणं येईल,


या कल्पनेनं मला मुर्ती बनून जगायचयं


पुन्हा एकदा दगड व्हायचयं,


मला पुन्हा एकदा दगड व्हायचयं......


तुझी ही दुर्दशा पाहुन मला,


तिला एकदा रडताना पहायचयं


अश्रुंमध्ये तरी तिच्या...


मला तुझं नाव शोधायचयं............


 


पुन्हा एकदा दगड व्हायचयं


मला पुन्हा एकदा दगड व्हायचयं...............


-नचि