आयुष्य असते प्रेमासाठी....
काय झाले जर थोडा तिरस्कार आला वाट्याला,
तुमचे प्रेम पुष्कळ आहे ते विसरायला.....
आयुष्य असते काहीतरी करुन दाखवण्यासाठी......
काय झाले जर मी थोडा धडपडलो तर,
शेवटी मी जिंकूनच दाखवणार आहे.......
आयुष्य असते बेधुंद होण्यासाठी....
कशासाठी.... कोणासाठी..... तरी वेडे होण्यासाठी .....
काय झाले जर लोक मला वेडे म्हणाले तर,
मला तर माझ्या जगण्याची प्रेरणा मिळाली आहे ना.......
आयुष्य असते जगण्यासाठी...
हसण्यासाठी...... रडण्यासाठी...
जिंकण्यासाठी..... आणि हरण्यासाठीसुद्धा.......
काय झाले जर आयुष्य छोटे असले तर,
आपण सगळे मिळून प्रत्येक क्षण साजरा करुया......... !
- राहुल.......................
१९-९-२००६ (एप्रिल २००६ मध्ये लिहिलेली :-) )