" भांडण "

खुपसारे प्रेम अन लहान-सहान वाद


फ़ोडणीशिवाय भांडणाच्या ना मैत्रीच्या भाजीस स्वाद..


बोलायला भेटायला तोंडओळख ही चालते


भांडायला मात्र कुणीतरी जवळचे असावे लागते...


अनेक होतील भांडणे अन होतील अनेक वाद


विश्वासाचे बंध हे कधी ना तुटती तयात...


जरी नसेन समोर मी अन हातात नसतील हात


तरी श्वासापर्यंत अखेरच्या सुटेल ना ही साथ..


प्रेम राहील तुजवरचे अबाधित नको मनी संभ्रम  कोठले


मैत्रीकरता सखे तुझीया मी हे आयुष्य तारण ठेवले...