खरंच का मी वेडा झालो?

एकटाच चालताना मी का अबोल झालो?


तुला अचानक समोर पाहिल्यावर मी का दचकलो?


तुझ्याशी बोलायला मी का संकोचतो?


सारखा तुझाच चेहरा का समोर येतो?


खरंच का मी वेडा झालो?


 


का तुझ्याच आठवणींनी मनात घर केले?


माझ्याच घरातुन मला कोणी हाकलले


मी कोनाबरोबर एकटाच चाललो?


माणसात असुन नसल्यासारखा झालो?


खरंच का मी वेडा झालो?