'लोकशाही'तील 'राज'कारण

देशाचा कारभार चालवण्याच्या कामाला सर्रास राजकारण म्हणतात. 'लोक'शाहीच्या या युगांत 'राज' हे पूर्वपद असलेला शब्द योग्य वाटत नाही. त्याऐवजी त्यासाठी लोककारण, देशकारण, राष्ट्रकारण, असा काहीतरी शब्द वापरावयास हवा. दुसरे असे की 'राज' या पूर्वपदामुळे त्या व्यवसायांत असणाऱ्या मंडळींत कुठेतरी राजेपणाची भावना असते. त्यामुळे त्यांना 'इतर लोकांवर सत्ता', 'आपल्या स्वार्थासाठी 'सैन्य' उभारणे' व 'स्वत:चे स्थान टिकविण्यासाठी इतरांविरुद्ध कारस्थाने' या गोष्टी अनुषंगिक निसर्गदत्त हक्क वाटतात. तसेच या व्यवसायांत नसलेली माणसे स्वत:ला प्रजा किंवा सामान्य माणसे समजतात व राजकारणी लोकांविषयी 'हेच आपले तारक व मारक, यांचा आपल्यावर अधिकार आहे, आपले जगणे व मरणे यांच्यासाठीच आहे, आपले यांच्यापुढे काही चालणार नाही' असे विचार मनांत बाळगून पूर्वी राजाकडे ज्या नजरेने लोक पाहात असत त्या नजरेने राजकारणी मंडळींकडे पाहतात. ही मानसिकता लोकशाहीला मारक आहे. म्हणून देशाचा कारभार चालवण्याच्या संदर्भांत राजकारण या शब्दाला (व राजकारणालाही) स्थान असू नये असे वाटते.


आपणांस काय वाटते?