ट्प ट्पणाऱ्या थेंबांनी
गंध दिला मातीला
श्रावण आला श्रावण आला
आहे गारवा सोबतीला
स्वच्छ झाली सृष्टी सारी
नदी नाले भरुनी आले
तापलेल्या धरतीलाही
थेंबानि शांत केले
दूर डोंगरातूनी फेसाळले पाणी
वाट ही हीरवाईची आहे दरी खोऱ्यात
होते अजूनी कळ्यांत जे
फुलले ते सारे क्षण
आला श्रावण आला श्रावण !
सुशांत तावडे