प्रिय बाबा, तुमचं पत्र पोचलं
खूप वाईट वाटलं !
प्रत्येक पत्रांत नीट वाग असं लिहीता..
तुमच्या मुलीला हेंच कां ओळखता ?
सासरच्यांना वाटेल
मुलीला वळणच नाही,
आठवण दिल्याशिवाय
वळणावर येत नाही
पुढील पत्रांत
हातांचा स्पर्ष पाठवा
बागेतल्या प्राजक्ताचा
बाटलीभर सुगंध पाठवा
गाईच्या गोठ्यातला
टोपलीभर गंध पाठवा
इथं एवढं मात्र मिळ्त नाहीं,
त्याविना मन रमंत नाहीं .
पाठवाल ना बाबा ?
-- कवि : य̱. गो. जोगळेकर
(ही कविता परदेशस्थ मराठींना नक्की आवडवावी)