वळून तू बघते कशाला
मिटून जातील अन्तरे
विश्वव्यपी जगताची
गळून पडतील बन्धने
हिमाद्रीच्य सुप्त पोटी
अवखळ चन्चला तू कशी
त्रिलोचनाच्या तान्डवाची
अशी प्रणीती तू का देशी
वळून तू बघते कशाला?
ग्रीष्म ऋतूच्या तप्त रविकिरणान्ची
य: किन्चीत तमा न तूजला
वन्ग सागराच्या आरोहाला
साद देशी तत्परा
तरीही वळून तू परत बघते कशाला?