माझ्या श्वासांची काय चुक
वार्यातुन तुझा गंध येतो,
माझं पाऊल निघत नाही
तुझ्या डोळ्यांचा बंध होतो.
अन तु म्हणतेस मी
नेहमीच तुला थांबवतो,
उशीर होतो तुला नेहमीच
अन,मी भेट लांबवतो.
तु भेट्तेस कधीतरी
वाट्तेस म्हणुन हवी- हवीशी,
जेव्हा- जेव्हा भेटतेस तु
वाटतेस मला नवी- नवीशी.
यात माझी काय चुकं........