तुझ्यासाठी वेडावणारं माझं मन
आठव जरा....
तुझ्यासाठी वेडावणारं माझं स्पंदन
आठव जरा....
माझ्या सोबतीतले काही क्षण
आठव जरा....
पाऊल वाटेवरचे "पाऊलव्रण"
आठव जरा....
कधी तुला हवासा होतो मी
आठव जरा....
मी जातो हे विसरुन सारे
तुझ्या डोळ्यात मला साठव जरा..
काहीच कसे आठवत नाही
काहीतरी आठव जरा...
माझ्या आसुसलेल्या डोळ्यांना
तुझा पत्ता तरी पाठव जरा...........
(जयेंद्र)