चारोळी

तुझ्या मिठीत गवसले मला


माझेच हरवलेले जगणे,


हात तुझा हाती येता,माझे


काहीच न उरले मागणे.


---------------------------------


आताशा मला तुझ्या मनात


हो,तुझ्याच मनात उरावेसे वाटते,


बोटांमधल्या रित्या जागांना


तु येउन भरावेसे वाटते.


---------------------------------