जगण्यात सुख आहे म्हणतेस
मला तुझे नसणे सतावत राहते,
तुझ्याविना जगतो मी असा
मला हे जगणे सतावत राहते.
डोळ्यात स्वप्ने आहेत माझ्याही
वास्तवाची तफ़ावत राहते,
तु भेटूनही मला माझ्या
मनातली आस सतावत राहते.
मी आहे ना? हे तु सांगत राहते
अन माझ्या डोळ्यातुन तु पांगत राहते,
माझ्या सुखांना अशी का ?
तु दु:खाच्या गोष्टी सांगत राहते.
तु आहेस मग का? तुला
माझ्या डोळ्यातली आस शोधत राहते,
मी खरचं आहे तुझ्या मनात
तु का माझे भास शोधत राहते.
सांग ना का हे जगणे मला सतावत राहते......