तु मला स्वप्नं दिलीस
माझ्या जगण्याला ध्यास दिला,
मी असाच उगाचच जगत होतो
तु आयुष्याला श्वास दिला.
माझी पाऊलं अडखळायची
तु मला वाट दिलीस,
आता माझ्यातुन उसळणारी
प्रत्येक जिवंत लाट दिलीस.
तु दिलंस आभाळ मला
माझ्यासाठी माझं म्हणुन,
आता मलाही जगायचय
तुझ्यासाठी,तुझा म्हणुन.....