खेळ "साप-शिडी" चा

 "व्हिज्युअल फॅक्ट फाइंडर- हिस्ट्रि टाइमलाईन" ह्या पुस्तकाच्या प्रृ. ११४ वर इ. स. ११९९ ते १२०९ ह्या कालखंडातील जगातील महत्वाच्या घडामोडींविषयी माहिती दिली आहे. त्याच पानावर 'उल्लेखनीय बाब'(फॅस्सिनेटिंग फॅक्ट) ह्या चौकटीत दिलेल्या माहितीचा स्वैर अनुवाद असा-


 "१३व्या शतकातील भारतीय कवी संत ज्ञानदेव यांनी कवड्या व फाश्याचा उपयोग करून एक खेळ तयार केला. ह्यात खेळाडू शिडीचा उपयोग करून वर चढणार व सापाच्या तोंडी आल्यावर खाली उतरणार.शिडीच्या सहाय्याने वर चढणे हे चांगले समजले जाई तर सर्पदंश ही अनिष्ट गोष्ट समजली जात असे. हा खेळ 'सापशिडी' ह्या नावाने अद्यापिही लोकप्रिय आहे."


 समाजरूढीच्या सर्पदंशाने विचलीत न होता योगमार्गाच्या शिडीने मुक्तीचा सोपान चढणारे संत ज्ञानेश्वर व वर उल्लेखिलेले संत ज्ञानदेव हे एकच आहेत काय? (टीप:- हिस्ट्री-टाइमलाईन हे पुस्तक माइल्स केली पब्लिशिन्ग लि. बार्डफिल्ड सेंटर ,ग्रेट बार्डफिल्ड, एसेक्स  सीएम७ ४एसएल यांनी २००५ मध्ये प्रकाशित केले आहे.)