मराठी भाषेतील कथालेखकांनी सुरू केलेला एक जिवंत कलाप्रकार - कथाकथन भारतातील १८ प्रमुख बोलीभाषांपैकी फक्त मराठी भाषेतच जन्माला आलेला आणि रसिकांनी दिलखुलास दाद दिलेला कलाविष्कार म्हणजेच - कथाकथन. कथालेखकांनी रूजवलेली,फुलवलेली आणि वाढवलेली ही कथाकथनाची कला पुढे नेण्यासाठी नवीन पिढीचे कथाकथनकार समर्थ आहेत.ही कथाकथनाची परंपरा पुढे नेण्यासाठी मी 'कथाबोली' हा कथाकथनाचा कार्यक्रम सादर करतो.यामध्ये विनोदी,गंभीर,रहस्यमय अशा विविध कथांचा समावेश असतो.कथांचे असंख्य प्रकार यात ऐकायला मिळतात.उदा.-तात्पर्यकथा,दंतकथा,चित्तरकथा,बोधकथा,जाहिरातकथा इ. अगदी पुराणकाळातल्या कहाण्यांपासून ते थेट आजच्या विज्ञानकथेपर्यंत.केवळ मराठीतीलच नव्हे तर जगभरातील मान्यवर कथाकारांच्या निवडक उत्तम कथा आणि लहांनापासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं बहारदार सादरीकरण यांमुळे कथांच्या पोतडीतल्या अनेक सुरस,बहुरंगी गोष्टींचा खजिनाच रसिकांवर उधळला जातो.एकाच प्रयोगात विनोदी आणि गंभीर,उत्कट अन भयकारी अशा विविधरंगी कथांचा आविष्कार श्रोत्यांना अनुभवायला मिळतो.
हा प्रयोग कुठेही,कोणासमोरही,केव्हाही होउ शकतो.प्रयोगाची तयारी सोपी आहे.एक उत्तम उभा माईक आणि मनमोकळी दाद देतील असे श्रोते.प्रयोगाचा कालावधी किमान एक ते तीन तास.
मग आता तुम्हीच ठरवा तुम्हाला काय ऐकायचयं ? - पोट धरून हसवणाऱ्या फक्कड गावाकडच्या गोष्टी की अंगावर काटा आणणाऱ्या थरारक भयकथा?
तुमचं नक्की ठरलं की मला मेल करा,तारीख,वार,वेळ,मानधन पक्कं करा अन मग फक्त मनसोक्त गोष्टी ऐकायला समोर येउन बसा, कसं?