गाणे विषण्ण तरीही तितुके सुरेल आहे...

पाण्यास ओढ वेडी आता कुठे किनारा
सारे जुने किनारे दृष्टीपल्याड गेले
जे सोसले तयाने नि:शब्द जाहलो मी
सारे मुके उसासे गाण्यात बद्ध केले...


                     झलो न शांत पुरता धग जाणवे अजून
                     आयुष्य भोगण्याची उर्मी अजून आहे
                     दिसते अजून जेंव्हा नवस्वप्न लोचनांना
                     शल्ये जुनी पुराणी उरि बाळगून आहे..


झाल्या पराभावांनी आहे दुभंगलेलो
जखमेंत सांधणारी अद्याप ओल आहे
सोसू शकेन कांही अजुनी,उरांत माझे
गाणे विषण्ण तरीही तितुके सुरेल आहे...


अशीच केंव्हा तरी वाचलेली, ही कविता माझी नाही. मला छान वाटलेली; इथे द्यावीशी वाटली म्हणून दिली.