मला माहीत होतं
तु माझ्यावर हसणारं,
मी रागावुन पाहिल्यावर
तु माझ्यावर रुसणारं.
तुझा रुसवा असा असतो
मला कधीच काढता येत नाही,
तु धरतेस अबोला असा
मला तो मोडता येत नाही.
मला"मलाच" शोधता येत नाही
तुझ्यात मी असा हरवतो,
तु शोधतेस मला कसे ?
सांग ना कुठे मी तुला गवसतो.
असं हसु नकोस ना माझ्यावर
सांग ना तु एकांतात कशी जगते?
मी नेहमीच गोंधळलेला
अन तु शहाण्यासारखी वागते....
जयेंद्र.