तिला भेटल्यानंतर तिला मिळवण्याची इच्छा श्वास घेऊ देत नाही
का भेटतो मी तिला? समजतच नाही..
ती गेल्यानंतरही छळत रहातात भास तिचे..
तिच्या डोळ्यातील प्रकाश ऊजळुन टाकतो ऱात्र माझी
चंद्रासारखीच आहे ती दिसायला अन तेवढीच दुर हे मनाला कधी पटतच नाही..
का भेटतो मी तिला? समजतच नाही..
परत डोके वर काढु पहातात ऊरात दडपलेली प्रेमाची सुख: स्वप्ने
अन अश्रुंना मात्र वाट करुन द्यायला जागा सापडत नाही
मग रेखाटत बसतो कवितेमधुन तिचीच चित्रे..
रहाते ती ऊभी प्रत्यक्ष समोर पण तिचा चेहरा मात्र कागदावर ऊमटतच नाही
का भेटतो मी तिला? समजतच नाही..
भेट होते फ़क्त पंधरा मिनिटांची पण आयुष्य सरल्यासारखे वाटते
ती येते निघुन जाते रहाते फ़क्त १ सुखद तरी जिवाला चटका लावणारी आठवण
मग जळत ऱहातो मी रात्रभर मेणबत्तीबरोबर..
स्वप्नात परत तिला भेटावे तर क्षणभरही पापणी मिटत नाही...
का भेटतो मी तिला? समजतच नाही..