आली आली हो डेंग्युची साथ
त्याला नका देऊ तुम्ही साथ
मारा फवारा करा त्यावर मात
तरी पुन्हा टाकेल तो ही कात
तो पहात नाही दिस-रात
फटी-भोकातून शिरतो आत
गुण-गुण ही बसतो गात
कानाकानाशी करतो बात
आपल्या अंगातलं रक्त ते खात
भल्या-भल्यांना आणतो वात
जाऊ नका तुम्ही त्याच्या वाट
नका करू पाण्याचे तुम्ही साठ
जरा जपून तुम्ही रहा
गुडनाईट नुसते म्हणा, गुरख्यासरखं जागत तुम्ही रहा
गुडनाईट लावून बसा, टाळ्या सारख्या वाजवत रहा
रात्र वैऱ्याची आहे रे बाबा
डासा-डासाशी करा तुम्ही लढा !