माझ्या राज्यात

लहान मूल सगळ्यांच्याच मनात दडलेलं असतं.  कधी कधी ते उसळी मारुन बाहेर येतं आणि मग त्याच्या राज्यात घेऊन जातं.


माझ्या राज्यात


नको गं उठवू आई
रंगलेय मी स्वप्नात
मी आहे राणी
माझ्या छोट्याशा राज्यात


आईस्क्रीमची नदी
अन् चॉकलेटची नाव
पेपरमिंटचे डोंगर
अन् बिस्किटांचा गाव


नाही इथे शाळा
अन् No Homework
फ़क्त आहे मज्जा
And no more work


दिवसभर खेळ फक्त
दिवसभर धम्माल
आम्हाला रागवायची
नाही कुणाची मजाल


रात्र होताच मात्र
संपली सारी खुशी
दुसरे काही नको आता
हवी तुझी कुशी


जयश्री