तुझ्यात आहे खुप काही
माझ्यात असं काहीच नाही,
तुझं हास्य लोभसवाणे
मजकडे जे नाहीच नाही,
तुझ्या डोळ्यात भविष्य उद्याचे
तुझ्या श्वासात आयुष्य उद्याचे,
माझे डोळे सुने सुने
श्वासात जगणे नाहीच नाही.
जे जे सारे जगणे असते
ते ते सारे तुझ्यामधे,
माझ्यामधे नाहीच नाही
माझ्यामधे,काहीच नाही...