मला वाटलं लिहु या त्याचं मनोगत ...
जातीव्यवस्थेमुळे भरडलेल्या त्याचं , वाटलं मांडावं स्वगत ..
मी उभी राहीले होऊन महार , ब्राह्मण सारे समोर उभे ,
करत होते माझ्यावर प्रहार
माझी सावली पडल्याने बाटत होते ते ..
मी करते ती सारी कामंही ' क्षुद्र ' म्हणत होते ते ..
बरोब्बर , हीच ती वेळ आहे संतापायची
आता मला संताप येईल अन उमटेल शब्दातुन
तावातावानं मांडीन मी ते एका काव्यातुन
त्याच वेळी ....
त्याच वेळी , माझ्या शिक्षणानं घात केला
त्या उच्चवर्णीयांचं मला हसु आलं
अज्ञानावर त्याच्या मला , ' फक्त ' हसु आलं
अन त्यांच्या वेडेपणाकडे मी चक्क दुर्लक्ष केलं ...
शेवटी त्याचं दुःख मांडायचं राहुन गेलं
माझ्या कवितेतुन ...