नेपाळी बटाटा

  • ४,५ बटाटे,२ टे-स्पून तेल,हळद१/२ चहाचा चमचा
  • मिरपूड १ चहाचा चमचा,मीठ चवीनुसार,कोथिंबीर
१५ मिनिटे
२ जणांना

बटाटे साले काढून लांब चिरा(फ्रेंच फ्राइज सारखे).तेल तापत टाका,त्यात हळद  घाला,बटाटे घाला,मिरपूड घाला‍,परता, झाकण ठेवा,बटाटे शिजत आले की मीठ घाला.अधून मधून परता नाहीतर बटाटा खाली लागतो.कोथिंबीर घालून सजवा.

पोळी/फुलक्यांबरोबर खा.

मी २ टे-स्पून लिहिले आहे पण या भाजीला तेल थोडे जास्त लागते.भाजी झाली की कढईतून दुसऱ्या वाडग्यात काढून उरलेल्या तेलात आमटी होते ,इतके तेल लागते,नाहीतर भाजी खाली लागते. नॉनस्टीक मध्ये कमी तेल लागेल.

माझे आजोबा आटगांवला असताना त्यांच्या कडे एक नेपाळी गुरखा खानसामा होता,तो अशी भाजी करायचा, अशी ती.बाबा त्यांच्या लहानपणीची आठवण सांगतात.

ती.बाबा