महाजालावर झी मराठी

बृहन् महाराष्ट्र मंडळाकडून  मिळालेल्या माहितीनुसार, झी टीव्ही मराठी आता महाजालावरदेखील उपलब्ध आहे. प्रसारणाची प्रत उत्तम असून, महाराष्ट्रातील कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण (डायरेक्ट फीड) करण्यात येणार आहे.


अधिक माहितीसाठी हा दुवा पहावा, किंवा Planetvu.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. मासिक शुल्क ९ डॉलर्स असून, पहिले दोन आठवडे विनामूल्य चाचणी सुविधा (फ्री ट्रायल) उपलब्ध आहे.


याव्यतिरिक्त इतर मराठी वाहिन्या उपग्रहाद्वारे उपलब्ध व्हाव्यात म्हणून बृ. म. मं. प्रयत्नशील आहे.