माझी मृदिनी...चैतन्याचं दुसरं नाव:)

प्रिय मनोगतींना,


प्रत्येक घरातून एक संवाद नेहमीच ऐकू येतो... "तुला वाढ्वल, मोठ केलं, आणि तु त्याचे असे पांग फेड्तोस/फेड्तेस" , म्हणजे हिंदी पिक्चर मध्ये नसत का "मैने तुम्हे पाल पोसके बडा किया , पढाया लिखाया , इतना एहसान किया".. वगैरे वगैरे , आज मी ही एक आई आहे, पण खरं सांगू , मुल लहान असताना त्याने आपल्याला जगातील सगळी सुखं दिलेली असतात... नाही का? सांगा बघू त्याचं मोहक रुपडं,बोबडे बोल, आहे काही मोल त्या आनंदाचे?


खलील कवितेने ही अशीच भावना जोपासत जन्म घेतला आहे... आपल्याला आवडेल अशी आशा करते!


प्रथम तुला बघुन माझ्या फुला


वेदना विसरले मी प्रसवाच्या


नाजूक तुझ्या कांतीला स्पर्श करता


कळली खरी जिवनाची सार्थकता॥१॥


 


हुंकार भरू लागलीस


इवल्याशा त्या तोंडाने


भाव तुझ्या डोल्यातले


साठवून ठेवले माझ्या मनाने॥२॥


 


दुडूदुडू चाल तुझी राणी


अन मोहक असते तूझी प्रत्येक मागणी


देवा,परमेश्वरा एकच मागणे


सदैव दे माझ्या बाळाला हसत खेळत जगणे॥३॥


 


तुला वाढवणे, आयुष्यात यशस्वी बनवणे


काहिच वाटणार नहीत ग हे सोपस्कार


तुझा हा मृदु सहवास म्हणजे


मृदिनी तुझे माझ्यावर असलेले जन्मोजन्मीचे उपकार॥४॥