जाता पुढे सुखा तू, तूज गाठले कितीदा
आयुष्य दु:ख आहे, मज वाटले कितीदा
हे पूर नेहमीचे, माझ्या नदीकिनारी
मीही तशात छोटे, घर थाटले कितीदा
कौलास भेग जाता, छाती पिटू नका रे
माथ्यावरील माझ्या, नभ फाटले कितीदा
आहे कबूल आहे, मीही गरीब आहे
श्रीमंत या मनाचे, धन वाटले कितीदा.
ही कवीता कोणी लिहीली, कोणास माहिती आहे का ?