भान

बहर सरला अन विखुरले
सारे सखे नी सोबती ...
कळले मला माझे नव्हे
ते सुखाचे सोबती ...
उमगले मजलाच माझे स्थान
या शिशीरातुनी
क्षणभरी गेल्या सार्‍याच
जाणीवा ही गोठुनी
उमगले ........
उमगले अंती परी,
शिशीर घेऊनी आज आला
जाणीव ही नवखी जरी
खरा वसंत बहरला
आताच मम अंतरी