दीपावली निमित्त शुभेच्छा

निळ्या आभाळाच्या क्षितिजावर धुके भरलेल्या नजरेने


दिवाळीच्या सणाकडे मी पहातो,


त्यावेळी आठवते फ़टाक्यांची आतषबाजी,


दिव्यांचा झगमगाट, स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी...


परंतु, या व्यवहारी जगात आपण आनंद व पैश्याचा व्यवहार


यांचं जणू कोडंच सोडवत असतो.


राग, लोभ, स्वार्थ, मत्सर, शत्रूत्व यांपासून


वैतागून जाऊन दूर कुठेतरी जाण्यापेक्षा


आपण हा कृत्रिम आनंद पैश्याने विकत घेण्याचा प्रयत्न करतो.


मनातील दुःख विसरण्यासाठी, आपण फ़टाक्यांच्या आवाजाची साथ घेतो


गोड बोलता येत नाही म्हणून आपण स्वादिष्ट मिठायांची मदत घेतो...


दिवाळी साजरी करण्यासाठी सर्वच वस्तू बाजारात विकत मिळतात.


व्यापाऱ्यांच्या दृष्टीने तो एक "सेल" चा भाग असतो.


परंतु, आपल्या दृष्टीने दिवाळी साजरी करण्याचा मतितार्थ काय?


अंतःकरणातील माणूसकी व प्रेम विसरून


दिव्यांची रोषणाई करण्यात आपण काय साधणार आहोत?


त्या साठी या दिवाळी निमित्त आपण अंतर्मनातील दिवे पेटवू...


सध्याच्या वातावरणांत आपापसांतील प्रेम, विश्वास, आदर कमी होत असतांना,


प्रत्येक गोष्टीतील अनिश्चिततेचा अंधःकार वाढत असतांना जपूयात...


आपल्यांत असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा एक किरण,


या दीपावलीच्या निमित्ताने उजळून टाकूया मनातील अंधःकार


किरणाकिरणांनी!!!


असंख्य शुभेच्छांसह...