फिनिक्स

स्वप्न घेऊन आले पंख
डोळ्यात जखमेला पुन्हा निळे पान्हे
आभाळरोगाचा एखादा रोगी
कण्हतो वादळ


विराम दिला स्वतःनंतर
आता मालकिचे काही नाही
वाटा आल्या वाटा गेल्या
भेगेचा झणाणा


जळात शिरला नग्नपणे
लाटावर आभाळ हलत राहीले ...
खोल खोल गर्भातकुणाच्या
त्याच्या परतिचे रस्ते
गुंता नुस्ता!