नीजरूप दाखवा हो, हरी दर्शनास या हो ॥

नीजरूप दाखवा हो, हरी दर्शनास द्या हो ॥


नरसिंह होऊनीया घुमवीत गर्जनासी


शत सूर्य तेज दावा अज्ञात या जनासी


भ्याला समुद्र तो हा ते रामचंद्र व्हा हो ॥१॥


पार्थास दाविले ते प्रभु विश्वरूप दावा


मुरलि मनोहरा या वा वाजवीत पावा


एका करांगुलीने गोवर्धना धरा हो ॥२॥


राजध्रमापटु या प्रत्यक्ष एकवार


श्रीकृष्ण विष्णु राम तोची विठू महार


जाळी तनामनाची ती आग शांतवा हो ॥३॥


संगितकार : सुधिर फडके 


गायक : सुधिर फडके 


गीतकार : ग. दि. माडगूळकर