सांवळाच रंग तुझा

सांवळाच रंग तुझा, पावसाळी नभापरी

आणि नजरेंत तुझ्या, वीज खेळते नाचरी ॥१॥

सांवळाच रंग तुझा, चंदनाच्या बनापरी

आणि नजरेंत तुझ्या, नाग खेळती विखारी ॥२॥

सांवळाच रंग तुझा, गोकुळिंच्या कृष्णापरी

आणि नजरेंत तुझ्या, नीत्य नांदते पांवरी ॥३॥

सांवळाच रंग तुझा, माझ्या मनीं झांकाळतो

आणि नजरेचा चंद्र , पाहूं केव्हां उगवतो ॥४॥

सांवळाच रंग तुझा, करी जिवा बेचैन

आणि नजरेंत तुझ्या, झालो गडे बंदिवान ॥५॥

गायिका : माणिक वर्मा

गीतकार : ग. दि. माडगुळकर

संगित : सुधीर फडके