सणांच्या शुभेच्छा

मला आलेल्या काही सणांच्या शुभेच्छा मी इथे मांडत आहे.

गणेश चतुर्थी..
तुम्हाला मिळो आनंद गणपती बाप्पाच्या पोटाएवढा,
आयुष्य मिळो बाप्पाच्या लांब सोंडे एवढं,
त्यात अडचणी येवोत त्याच्या उंदराएवढ्या छोटयाश्या,
आणि अनेक क्षण येवोत त्याच्या मोदकासरखे गोड,
बोला, गणपती बाप्पा मोरया

नवरात्री...
या नवरात्रात आम्ही तुमच्याकरता ९ गोष्टींची कामना करतो.
१. सुख
२. शक्ती
३. संयम
४. सन्मान
५. साधेपणा
६. सफलता
७. समॄध्दी
८. संस्कार
९. स्वास्थ

दसरा..
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचे सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसांच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना,
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

लक्ष्मीपूजन..
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली.

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे,

धनत्रयोदशी..
पहीला दिवा आज लागला दारी,
सुखाची किरणे येई घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

दिवाळी..
फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.