दुधी भोपळ्याचे ठेपले

  • दुधी भोपळ्याचा कीस २ कप
  • आले-लसूण पेस्ट-२ टी स्पून, कोथिंबीर, दही१/२ कप,
  • किसलेला गूळ -३/४ कप, गरम मसाला २ टी स्पून, मीठ चवीप्रमाणे,
  • तेल, तीळ -१ टी स्पून, कणिक, हिंग, हळद.
३० मिनिटे
२ जण

१. दुधी भोपळ्याचा कीस हाताने दाबून पाणी काढून टाकावे. 

२. दही, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, कोथिंबीर, किसलेला गूळ -३/४ कप, तीळ -१ टी स्पून, मीठ, हिंग, हळद हे नीट एकत्र करून घ्यावे. त्यात भोपळ्याचा कीस घालावा. त्याला पाणी सुटते. त्यात मावेल इतकी कणीक घालून घट्ट मळून घ्यावे. त्याला तेलाचा हात लावून १५ मिनिटे घट्ट झाकून ठेवावे.

३. नंतर, त्याचे पराठे लाटून बटर/ तूप / तेला वर शेकून घ्यावेत.

४. भाजी, लोणचे, चटणी, केचप बरोबर खाण्यास द्यावेत.

हे ठेपले थोडे जाडच लाटावेत. भाजताना,  तूप / तेल सोडून, नीट तव्यावर दाबून भाजावेत म्हणजे ते खुसखुशीत होतात. गूळाची गोडसर चव छान लागते.

मेत्रिण