ऋतु सरला हा फ़ुलता फ़ुलता मधूबनी या
कधी न कळले
दवबिंदुंसह उडोनी गेला गंधभार ही फ़ुलांत नुरला
श्वास निमाले
नजरेमधली फ़िकी जाहली इंद्रधनुषी रंगपंचमी
दृष्टि थिजली
अंकुरलेली राजसबाळी जिव्हाळपाती तृषावली
काळीज साकळले
पाचोळा हा भावफ़ुलांचा उरे पदतळी निर्माल्यागत
जीणे थबकले............
शीला.